केशवसुमार यांचे काव्य कर्तनालय
तुम्ही मला ज़मीन द्या, मी तुम्हाला विडंबन देतो.
एकूण पृष्ठदृश्ये
बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५
मन तुझं भोळभाबड...
दरवेळी आपली वाटते ' ए आये' ची गाज
बोल तुझे चावट तरी पिक्चर दगाबाज नाही
चड्डीला काज नाही नाडीची ह्या लाज नाही
किती नट आले गेले तुला काय घेणं
गिनीजबुकात नाव तुझ सिल्वर जुबिली लेणं
मान सन्मान दोन्ही काय काल होते आज नाय
चड्डीला काज नाही नाडीची ह्या लाज नाही
मन तुझं साधभोळ...
दरवेळी कशी येते विडंबनाची गाज
टीका तुझी वर्मी तरी गाणे राडेबाज नाही
कवड्यांना लाज नाही केश्याला इलाज नाही
किती कवडे आले गेले तुला काय घेणं
फेसबुकी वावर तुझा गावामधलं बेणं
लाइक कॉमेंट दोन्ही काय काल होते आज नाय
कवड्यांना लाज नाही केश्याला इलाज नाही
रविवार, ११ मे, २०२५
माध्यमी खास वेड्यांचा...
माध्यमी खास वेड्यांचा । तमाशा चालला सारा ।
गमे या भ्रान्त संसारी । खऱ्याचा एक ना तारा ॥
भ्रमाने टिआरपीच्या । तयांचे चित्त ते नाचे ॥
कुणाला दाम बहकावी । कुणाला पक्ष चळ लावी ।
कुणाची नजर धर्माच्या । नशेने धुंदली भारी ॥
अशा या भडक माथ्यांच्या । पिश्यांच्या लहरबहरींनीं ।
पहा या जाल दुनियेची । भिंत ही रंगली सारी ॥
गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२५
चाळ ही हदरून जाते ...
चाळ ही हदरून जाते चालता तू चंचले
देह हा हलवीत जाशी हालती पाळेमुळे
वाटते पाहून तिजला ही कटी की कंबरा
काल थोडीशी पळाली दार अमुचे मोडिले
वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या
जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले
गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ?
लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले
सारखे शिंकीत जाशी...
सारखे शिंकीत जाशी का असे तू चंचले
वेंधळी पाहून मुर्ती हासती सारी मुले
वाहते नाकात गंगा ना कटी रूमाल ही
मोकळे नाका करोनी हात पदरा पूसीले
शिंकूनी जीव हा बेजार की पायी हिच्या
मी अशा शिंकेवरी, सर्दीवरी वैतागले
घे जरा वाफा घशाला झाक अन काया तुझी
पाहू दे सर्दीविण मज नाक तूझे मोकळे
उघडी पाठ
स्वाती ताईंची हिरवी जिद्द बघून आमच्या वस्तिगृहातील काही आठवणी हिरव्या झाल्या
रद्दीच्या साठलेल्या थरात....
मासिकाचा बोटभर तुकडा शोधून,
टंच टंच दिसणार्या जाहिराती मधल्या
वितभराच्या कपड्यात....
किती ग सुंदर दिसतेस!
तुझ्या एका उघड्या पाठीनं
''जीव शिंपडलाय या देखाव्यात''
शरीराला घट्ट धरून ठेवणारी तुझी वसनं...
आणि पांढर्या शुभ्र 'पार्श्व'भूमीवरच..
तो टोकाचा हसरा काळा तीळ,
म्हणजे सौंर्दयाचा कळस!
आहा...!
डोळे अगदी तृप्त झाले तुला पाहून.
बर आहे..., तू चित्रात आहेस!,
अशीच राहशील कायम...
अशीच राहील तुझी कमनीय काया,
तुझ कोवळे पण..
तुझी उघडी पाठ!
न जराठता, कोमेजता!
=====================
केशवसुमार............ १९-०७-२००८
गुरुवार, ५ डिसेंबर, २०२४
कमळाला जड झाले नाते धनुष्यबाणाचे
जुन्या विडंबनात काही बदल करून